You are currently viewing वैभववाडी ते शिराळे कुर्ली रस्त्याचे दुरावस्थेबाबत प्रशासनाचे  नवलराज काळे यांनी वेधले लक्ष

वैभववाडी ते शिराळे कुर्ली रस्त्याचे दुरावस्थेबाबत प्रशासनाचे  नवलराज काळे यांनी वेधले लक्ष

रस्त्याची दुरवस्था दूर झाल्यास सडुरे शिराळे कुर्ली सहित अरूळे निम अरूळे सांगुळवाडी गावातील विद्यार्थी व प्रवाशांना मिळणार दिलासा

वैभववाडी

06 जुलै 2022 रोजी वैभववाडी तालुका तहसील कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध विभागाच्या कामाबाबत व सध्या चालू असलेल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा बैठक पार पडली.या बैठकीत भारतीय जनता पार्टी भटके व विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सडूरे शिराळे श्री नवलराज काळे यांनी ग्रामीण भागातून शहराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधले. त्यामध्ये 8 जून 2022 रोजी वैभववाडी ते सडूरे शिराळे कुर्ली रस्त्यावरील खड्डे व झाडी मारण्याकरिता संबंधित अधिकाऱ्या कडे विचारणा केली असता निधीचा तुटवडा आहे काम होऊ शकणार नाही अशा प्रकारची उत्तर देण्यात आली होती. त्याबद्दल या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यास विचारणा केली असता त्यांनी निधीच्या कमतरतेमुळेच सदर काम होऊ शकले नाही असं सांगितल्यावर त्यावर आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्यात निधीचा तुटवडा पडत होता परंतु आता आमचे सरकार आहे येणाऱ्या काळात निधीचा तुटवडा पडणार नाही आवश्यक ते प्रस्ताव इस्टिमेट करून माझ्याकडे सुपूर्त करा सर्व कामे मार्गी लावले जातील. कामात वेळ काडूपणा, कामचुकारपणा केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची खैर केली जाणार नाही अशा प्रकारचा सज्जड दम आमदार नितेश राणे यांनी दिला. व सडूरे शिराळे कुर्ली रस्ता दुरुस्तीबाबत योग्य प्रस्ताव व इस्टिमेट करून देण्याच्या सूचना आमदार यांनी सदर बैठकीत केल्या.सदर रस्त्याची दुरवस्था दूर झाल्यास सडुरे शिराळे कुर्ली सहित अरूळे निमअरूळे सांगुळवाडी गावातील विद्यार्थ्यांना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आमदार नितेश राणे यांनी या विषयात लक्ष घातल्यामुळे वैभववाडी सडूरे शिराळे रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. यावेळी आमदार नितेश राणे, भाजप वैभववाडी तालुकाध्यक्ष नासिरभाई काझी, तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक यादव, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,भाजप जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, माजी उपसभापती अरविंद रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, नगराध्यक्षा नेहा माईंकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत,भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा सल्लागार माजी उपसभापती अंबाजी हुंबे, महिला तालुका अध्यक्ष प्राची तावडे, भाजप भटक्या विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका महिला शहराध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती सुंदरी निकम,जिल्हा उपाध्यक्ष बंड्या मांजरेकर, संताजी रावराणे व इतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते संबंधित सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

प्रतिक्रिया व्यक्त करा