You are currently viewing प्रबोधनात्मक पथनाट्यातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण

प्रबोधनात्मक पथनाट्यातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण

सिंधुदुर्ग जलसंपदा विभागाचा अभिनव उपक्रम
कुडाळ येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाला उस्फूर्त सहभाग लाभला.

जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गात जल व्यवस्थापन या विषयावर प्रबोधनात्मक पथनाट्यातून प्रशिक्षण असा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

जलसंपदा विभागातर्फे घेण्यात आलेल्या एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक मामा शेटे वाल्मी औरंगाबाद त्याचप्रमाणे कृषी विभाग महाराष्ट्र शासन कुडाळचे कृषी अधिकारी आणि कृषी विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे कृषी अधिकारी लाभले होते.

शेतकरी प्रशिक्षण वर्गासाठी मनोरंजन आणि प्रशिक्षण या दोन्हींचा संगम घडवून आणत नाद फाउंडेशन व अर्चना क्रिएशन औरंगाबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट पथनाट्य सादर करून प्रबोधनात्मक जलव्यवस्थापनाचे व शेतीचे मार्गदर्शन करण्यात आले.

जलसंपदा विभाग सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता संतोष कविटकर यांनी प्रास्ताविक करताना नियोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजनातून जलव्यवस्थापन कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करताना संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा यासाठी शेतकरी वर्गाला मनोरंजनातून प्रशिक्षण कसे देता येईल याचा विचार करून एक नवा आणि आगळावेगळा प्रयोग म्हणून मनोरंजनात्मक पथनाट्य सादर करून पथनाट्याच्या माध्यमातून प्रशिक्षण देत असल्याचे सांगितले.

सिंधुदुर्गात पाटबंधारे प्रकल्प.तिलारी येथील मोठा प्रकल्प, सिंधुदुर्गातील अधिकचे क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चाचे पाटबंधारे प्रकल्प होऊ घातले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतजमनी ओलिताखाली येण्यासाठी कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या दारात पाणी उपलब्ध व्हावं, हा उदात्त हेतू… त्यासाठी पाणी वापर संस्था हा महत्त्वाचा दुवा आहे… याबाबत जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने सिंधुदुर्ग जलसंपदा विभागाने बुधवारी कुडाळ येथे वासुदेवानंद सभागृहात एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. औरंगाबाद येथील आरती पाटणकर यांच्या टीमने पथनाट्य सादर करून शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व आणि त्यातून आर्थिक उन्नती कशी सांगता येईल याबाबत पथनाट्यातून मार्गदर्शन केले.

जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेचे निवृत्त प्राध्यापक बा. मा. शेटे साहेब यांनी आपल्या व्याख्यानातून जल व्यवस्थापनाचे उत्तम धडे दिले औरंगाबाद येथील जायकवाडी धरणातून केल्या जाणाऱ्या जलवाटपाबाबत तेथे कार्यरत असलेल्या त्याचबरोबर इतर जिल्ह्यातही जलव्यवस्थापन साठी कार्यरत असणाऱ्या पाणीवाटप संस्थांची माहिती देत सरकारने वैयक्तिक शेतकऱ्याला धरणातून पाणी न देता जलवाटप करण्याकरिता पाणी वाटप संस्था स्थापन करून पाणीवाटप संस्थेद्वारे जल व्यवस्थापन करण्याचे आदेश दिल्यामुळे पाणी वाटप योग्य प्रकारे होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे मार्गदर्शक वाल्मी संस्थेचे निवृत्त प्राध्यापक बा मा शेटे साहेब यांचे कृषी अधिकाऱ्यांकडून शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर श्री यादव साहेब यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता श्री संतोष कविटकर यांनी केले.

नाद फाउंडेशन व अर्चना क्रिएशन औरंगाबाद यांनी आपल्या विविध रंगी पथनाट्यातून कार्यक्रमात रंगत आणली आणि शेतकरी वर्गाला पथनाट्यातून जल व्यवस्थापन व शेतीचे धडे दिले.

जलसंपदा विभाग सिंधुदुर्ग आयोजित एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचा समारोप करताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी सौ कविटकर मॅडम यांनी उपस्थित सर्व प्रमुख मार्गदर्शक कार्यक्रमात रंगत आणणाऱ्या नाद फाउंडेशन व अर्चना क्रिएशन औरंगाबाद आणि कार्यक्रमासाठी उपस्थित शेतकरी वर्गाचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता कार्यकारी अभियंता संतोष कविता यांनी विशेष परिश्रम घेतले. जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा