कोचरे आरोग्य उपकेंद्रास फणसेकर कुटुंबीयांकडून थर्मल गन, माक्स सुपूर्द
कोचरे आरोग्य उपकेंद्रास फणसेकर कुटुंबीयांकडून थर्मल गन, माक्स सुपूर्द

कोचरे आरोग्य उपकेंद्रास फणसेकर कुटुंबीयांकडून थर्मल गन, माक्स सुपूर्द

संपूर्ण जगात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्याच्या पार्श्वभूमीवर कोचरे उपकेंद्र येथे कोरोनाच्या कठीण काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणा-या आरोग्य सेवकांना माक्स व आरोग्य केंद्रास थर्मल गन कै.वासुदेव शंकर फणसेकर यांच्या स्मरणार्थ कल्याण वासुदेव फणसेकर कुटुंबीय यांनी सामाजिक बांधिलकी जपत कोचरे येथील आरोग्य उपकेंद्रांचे डाॅ.मधुरा काटकर यांच्याकडे कोचरे संरपच सौ.साची फणसेकर यांच्या उपस्थितीत थर्मल गन, माक्स सुपूर्द करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ.साची फणसेकर, डाॅ.मधुरा काटकर, कल्याण वासुदेव फणसेकर कुटुंबीय, ग्रा.प.सदस्या प्रतिक्षा पाटकर, आरोग्य सेविका सौ.राऊळ, सरस्वती राऊळ, कोचरे तलाठी श्री.ठाकुर, कोचरे ग्रामसेवक प्रविण भोई, कोचरे सोसायटी चेअरमन श्री.तायशेटे, कोचरे पोलिस पाटील श्री.चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा