You are currently viewing सिंधुकन्या लोकासंचालित साधनकेंद्र कट्टा मालवण यांच्या वतीने भाई मांजरेकर, शरद मांजरेकर, विजय नेमळेकर यांचा पुरुष सन्मान पुरस्काराने गौरव

सिंधुकन्या लोकासंचालित साधनकेंद्र कट्टा मालवण यांच्या वतीने भाई मांजरेकर, शरद मांजरेकर, विजय नेमळेकर यांचा पुरुष सन्मान पुरस्काराने गौरव

मालवण

मालवण तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या कमलाकर (भाई) मांजरेकर, शरद मांजरेकर, विजय नेमळेकर यांचा
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुकन्या लोकासंचालित साधनकेंद्र कट्टा मालवण यांच्या वतीने पुरुष सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, कृषी अधिकारी संजय गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, उपाध्यक्षा शीतल कांबळे, आयसीडीएस पर्यवेक्षिका उल्का खोत, मृणाल सावंत, प्रिया परब, भिमसेन पळसंबकर, संजय बंगडे, बापू बावकर, संतोष निकम, सतिष कदम, समीर टाकेकर यासह व्यवस्थापक गीता चौकेकर, उपजीविका सल्लागार आशिष मडवळ, लेखापाल दामिनी सकपाळ, सहयोगीनी स्मिता लंगोटे, मंगल तांबड यासह अन्य उपस्थित होते.

महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन अंगीकृत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम प्रकल्प द्वारा महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा मालवण यांच्या वतीने जेंडर व न्यूट्रिशन घटक अंतर्गत तालुकास्तरीय पुरुष सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम अथर्व सभागृह कुंभारमाठ मालवण येथे संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा