You are currently viewing “मेघ:श्याम”

“मेघ:श्याम”

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना

कृष्ण सावळ्या मेघाचे येतो रूप घेऊन
निसर्ग सृष्टी सर्व वाट पाहे आर्जवून।।ध्रु।।

इंद्र देवाची पूजा बंद करवी श्रीकृष्ण
सर्वां रक्षी करंगळीवर घेत गोवर्धन
युगेयुगे पर्जन्य रुपे देतो संजिवन ।।1।।

दुःख दैन्य दारिद्र्या पासून करी रक्षण
दुष्काळ दूर करी पाऊस आनंदघन
युगेयुगे बरसतो करी सर्वां आश्वस्त।।2।।

सर्व वाट पहाती चातकासम जागून
राधेला भेटे श्याम मुरारी मेघ रुपानं
ओठावर नाम येते उदाराचे आदरानं।।3।।

सगळे रान हिरवे गार केले पावसानं
पाचूच्या हिरव्या रानी आले हळदीचे ऊन
गगनाचा गाभारा भरला मृद् गंधानं।।4।।

पावसाची प्रेमभाषा असते शब्दातीत
अंतर्यामी सूर उमटे येई सुरेल तान
स्वागत करू त्याचे गाऊ आनंदाचे गाणं।।5।।

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन. 410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा