जशी तू आज आहेस….

जशी तू आज आहेस….

जशी तू आज आहेस,
तशीच कायम राहशील का?
तुझ्या गालावरची लाली,
माझ्या ओठांवर देशील का?

नाजूक कमनीय बांधा तुझा,
असाच तू जपशील का?
गालावरची खळी तुझ्या,
सदा खुलत ठेवशील का?

यौवणातलं सौन्दर्य तुझं,
आरशात पाहशील का?
हेवा वाटेल त्या काचेलाही,
काचेशी फारकत घेशील का?

लांबसडक बटा केसांच्या,
हवेत उडवत ठेवशील का?
शुभ्र पांढरा गजरा मोगऱ्याचा,
केसात तुझ्या माळशील का?

पापण्या तुझ्या मिटताच सखे,
तू श्वास रोखून धरशील का?
जवळ येता कधीतरी तुझ्या,
तू मिठीत सामावून जाशील का?

जशी तू आज आहेस
तशीच …………..

(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा