You are currently viewing स्वेता

स्वेता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमरानी लिखीत अप्रतिम चाराक्षरी काव्यरचना*

*स्वेता*

तुरूतुरू
चालतीस
सुखदुःख
सहजच
झेलतीस

काटेरीही
जीवनात
फुलासम
मकरंदी
फुलतीस

जीवनाचा
सरीपाट
निवडुंगी
काटेसेजी
फसलेला

गालावरी
नाचतात
ते दवाश्रू
सुखदुःख
वाचतात

चुलीसवे
पेटलेली
महाभूक
अश्रूजली
विझलेली

उजाडता
भूकपक्षी
रांगोळीत
हसतात
चित्र नक्षी

मकरंद
पिता पिता
पक्षी बोले
तुझ्यासवे
स्वेता स्वेता

मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 7 =