जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.आशा भावसार यांचा अप्रतिम वैचारिक लेख
🧚♀️ *पंछी बनके उड़ती फिरू मस्त गगन में।*
*आज मैं आजाद हूं दुनिया के चमन में।*💃
असं गाताना आणि ऐकताना किती छान वाटतं!
पण खऱ्या अर्थाने आज समाज इतका सुधारला का? मुलींना मुलां एवढे स्वातंत्र्य आहेत का ? का आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणून ? स्त्री *अजूनही गृहीतच आहे* असे अनेक प्रश्न आपल्यासमोर नेहमी उभे राहतात. परंतु आपण त्यावर विचारही करत नाही.
आज घरोघरी आपण पाहतो पूर्वीपेक्षा मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय पण कुठे ना कुठे मुलापेक्षा मुलीला बंधने ही आहेतच. लहानपणापासून तिची घडण ही एका साचेबद्ध चौकटीतच झालेली आपल्याला दिसते. आणि तीही ती चौकट म्हणजेच आपली परिसीमा असे समजत असते…. सतत तिच्या कानावर दुसऱ्याच्या घरी जायचे ,..लोक काय म्हणतील?..आपली इज्जत जाईल…. अशा अनेक गोष्टी तिच्या कानावर पडत असतात.
आजही स्त्रीला आपण बघतो तेवढे विचार स्वातंत्र्य नाही. कालच एक उदाहरण खूप दिवसांनी गावाकडील काकू भेटल्या त्यांनी इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या तेव्हा त्यांना मी विचारलं ”काय करते हो आता अमृता ? त्यावर त्या म्हणाल्या,” काही नाही, झाली बघ १८ वर्षाची, बारावीही झाली,बघू आता लग्नाचं असू देत लक्ष. त्यावर मी म्हटलं ”अहो काकू ती तयार आहे का इतक्या लवकर लग्नाला?…..तिला शिकवा , स्वतःच्या पायावर उभी करा, नंतर बघू ना लग्नाचं ” पण काकूंनी तेवढ्यात सुरू केलं ” मुलीची जात परक्याचं धन, किती दिवस ठेवायचं ? आणि लग्नाला तयारीचं काय…. मुली काय स्वतः म्हणतात का… माझं लग्न करायचं ……वय झाले की आपणच समजून घ्यायचं ”
म्हणजे हे *एक गृहीतच ना..*
आपली जबाबदारी म्हणून तिच्या स्वप्नांचा , आयुष्याचा विचार आपण करायचा नाही का?…
अशाच प्रकारे ती सतत आपले मन मारून जगत असते कारण *तिला सतत कुठे ना कुठे कोणी ना कोणी गृहीतच धरत असतो.*
*आईना हुं*
*बिखरती नहीं*
*दर्द से भरी हूं*
*जीना छोड़ती नहीं*
अशीच काहीशी तिची परिस्थिती असते. आज आपण घरोघरी पाहतो कुटुंबासाठी ती राबते, सर्वांना जीव लावते , घरातील लहान थोरांची काळजी घेते , प्रत्येकाच्या एका हाकेला हजर होते , एवढे करूनही ती कधी थकत नाही का ? तिला कंटाळाही येत नाही का? पण तिचे ते रोजचेच काम ती करत राहते…म्हणून तिच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. तीही ते सर्व निसंकोचपणे, प्रेमाने, निस्वार्थपणे करतच राहते. म्हणूनच तिला *गृहीत धरले जाते…..*
घराप्रमाणे समाजातही तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा स्त्री म्हणजे अबला असाच असतो पण समाज हे का विसरतो. स्त्री शिवाय हे जग नश्वर आहे. स्त्री ही एक आई, बहीण, मैत्रीण, पत्नी अशा विविध नात्यांची गुंफण आहे. आणि ती वेगवेगळ्या रूपात आपली भूमिका सतत पार पाडत असत.े कोणत्याही संकटाला निर्भीडपणे सामोरे जाण्याची हिंमत तिच्यात आहे. पण आपण का ती *एक स्त्री आहे असे गृहीत धरतो*
*नारी प्रीत में राधा बने*
*गृहस्ती में बने जानकी*
*काली बनके शीश कांटे*
*जब बात हो सम्मान की*
नारी एक शक्ती आहे. जिजाऊ,सावित्रीबाई ,झाशीची राणी अहिल्याबाई, इंदिरा गांधी, कल्पना चावला, मेरी कोम इत्यादींचे कार्य हे मोठे उल्लेखनीय आहे.तेव्हा त्यांचा आदर्श समाज का विसरतो?…… मुलींना सर्व स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार आहे. तेव्हा तिलाच शिक्षण घेऊन समर्थपणे आपले आत्मरक्षण करून उंच झेप घ्यावी लागेल. तेव्हाच कुठे तरी *अजूनही ती गृहीतच का?* हे कमी होईल!
*सौ.आशा भावसार* *जालना*