You are currently viewing आमदार दिपक केसरकर समर्थक गणेश प्रसाद गवस यांचा पत्ता कट

आमदार दिपक केसरकर समर्थक गणेश प्रसाद गवस यांचा पत्ता कट

संजय गवस दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख
 
दोडामार्ग

दोडामार्ग शिवसेना तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. गणेशप्रसाद गवस यांची दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली होती. मात्र आमदार दिपक केसरकर यांच्या शिंदे गटाकडे जाण्याने समीकरणे बदलू लागल्याचे दिसत असून, गणेशप्रसाद गवस यांच्या जागी संजय गवस यांची प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तसे पत्र जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिले आहे.
गणेशप्रसाद गवस हे आमदार दिपक केसरकर यांच्यासोबत जातात की मूळ शिवसेनेत राहतात ही त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे, मात्र ते केसरकर समर्थक म्हणून ओळखले जातात. दिपक केसरकर हे राष्ट्रवादी पक्षातून शिवसेनेत आल्यानंतर गणेशप्रसाद गावसही सेनावासी झाले होते. त्यामुळे गणेशप्रसाद गवस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, तर दोडामार्ग तालुकाप्रमुख पद मिळावे, ही महत्वाकांशा असलेले तरुण तडफदार नेतृत्व संजय गवस यांची या पदावर नेमणूक झाल्याने शिवसेना पक्ष वाढीसाठी तेही सक्रिय होतील हे निश्चित.मात्र आता दिपक केसरकर यांच्यासोबत कोण पदाधिकारी व कार्यकर्ते दिसतात हेही पाहणे तालुका वासीयांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =