You are currently viewing आंबोली घाटातील अवजड वाहतूक बंद करा, राष्ट्रवादी काँग्रेसची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

आंबोली घाटातील अवजड वाहतूक बंद करा, राष्ट्रवादी काँग्रेसची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

सावंतवाडी

आंबोली घाटात अवजड वाहतूकीला बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात घाटातून अवजड वाहतूक सुरू असून, त्यामुळे घाट दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. त्यामुळे यावर लक्ष घालून तात्काळ अवजड वाहतुकीवर बंदी घालावी अशी मागणी बांधकाम आधिकारी सौ. अनामिका चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादी पधिकारी यांनी भेट घेऊन केली आहे. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखालील आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्च केली.

याबाबत दळवी चर्चा करताना म्हणाले की आंबोली घाटात अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून एखाद्यावेळी घाट कोसळा तर याचा परिणाम तिकडील स्थानिक व्यापाऱ्यांवर होऊ शकतो त्यामुळे यावर लक्ष घालून बंदी घालावी तसेच याआधी कोरोनामुळे स्थानिक व्यापारी तिकडे त्रस्त झाले होते अशातच आता कुठेतरी सुरू झाले असताना अवजड वाहतूक कुठेतरी त्यांचे डोकेदुखी ठरत आहेत त्यामुळे यावर तात्काळ बंदी घाला तसेच सावंतवाडीत येणारा भाजी पुरवठा वैगरे तिकडून घाट मार्गेद्वारे होतो. त्यामुळे यावर लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच घाटात ठिकठिकाणी वाढलेली झाडे देखील तोडण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच विश्रामगृह येथील गोडाऊन वर आलेल्या झाड हे धोकादायक बनले असून ते देखील कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे तात्काळ ती तोडण्यात यावी अशी देखील मागणी यावी केली आहे

यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर,सावली पाटकर, इपफतिगार राजगुरु, संतोष जाईल, , रिद्धी परब ,सायली दुभाषी,बावतिस फर्नांडिस; राकेश नेवगी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा