You are currently viewing कुडाळात रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने ४ एप्रिल रोजी अवाॅर्ड सोहळा

कुडाळात रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने ४ एप्रिल रोजी अवाॅर्ड सोहळा

कुडाळात रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने ४ एप्रिल रोजी अवाॅर्ड सोहळा

कै.मच्छिंद्र कांबळी जन्मदिनाचे औचित्य..

कुडाळ

मालवणी नटसम्राट कै. मच्छिन्द्र कांबळी यांचा ४ एप्रिल हा जन्मदिवस. हा मालवणी भाषा दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून येत्या ४ एप्रिल रोजी कुडाळच्या रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने मालवणी अवॉर्ड्स सोहळा रंगणार आहे. यंदाचे हे या पुरस्काराचे दुसरे वर्ष असून यंदापासून पहिल्यांदाच कलासिंधू पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी चंदू शिरसाट याना जाहीर झाला आहे. याशिवाय इतर १५ प्रकारामध्ये मालवणी अवॉर्ड दिली जातील. त्याची सुद्धा घोषणा शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रिल्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर, क्रियेटीव्ह हेड तेजस मसके, सदस्य निलेश गुरव, रुचिता शिर्के यांनी केली.
मालवणी नटसम्राट आणि वस्त्रहरणकार मच्छिन्द्र कांबळी उर्फ बाबूजी यांची ४ एप्रिल रोजी जयंती. तो दिवस समस्त मालवणी मुलुखात मालवणी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून रिल्स मालवणी या ग्रुपच्या वतीने गेल्या वर्षीपासून मालवणी अवॉर्ड्स सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा या पुरस्कार वितरण सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे. यंदाही ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निलेश गुरव यांनी दिली.

चंदू शिरसाट यांनी कलासिंधू पुरस्कार

विविध क्षेत्रातील मालवणी अवॉर्ड्स सोबतच यंदापासून रिल्स मालवणी तर्फे कला क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारासाठी कलासिंधू पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी चंदू शिरसाट यांना घोषित करण्यात आल्याची माहिती रिल्स मालवणीचे क्रियेटीव्ह हेड तेजस मसके यांनी दिली. रोख रुपये ११ हजार, मानपत्र शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विविध १५ मालवणी पुरस्कार:
त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ जणांना देखील मालवणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष, सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक स्त्री, सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार, सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमेली, सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक, सर्वोत्कृष्ट मालवणी वेबसीरीज, सर्वोत्कृष्ट मालवणी संस्कृती अभ्यासक, सर्वोत्कृष्ट मालवणी मालिका, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट मालवणी पत्रकार (प्रिंट मीडिया), सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत, सर्वोत्कृष्ट मालवणी दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट मालवणी रील या प्रकारांचा समावेश आहे.

मालवणी रिल्स स्पर्धा जाहीर
या निमित्ताने रिल्स मालवणी यांच्या तर्फे ‘माझी भाषा मालवणी भाषा, या विषयवार रिल्स बनवण्याची स्पर्धा
मालवणी रिल्स स्पर्धा जाहीर

या निमित्ताने रिल्स मालवणी यांच्या तर्फे ‘माझी भाषा मालवणी भाषा, या विषयवार रिल्स बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हे रिल्स ९० सेकंदांचे असणे आवश्यक आहे. जे रील सर्वोत्कृष्ट ठरेल ते रिल्स मालवणी च्या पेज सोबत जोडले जाईल आणि त्या विजेत्याला ४ एप्रिल दिवशी सन्मानित केले जाणार आहे. त्या रिल्स स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी : ९८३४४५५१७२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रुचिता शिर्के यांनी केले आहे.

मालवणी दिनादिवशी सुट्टी जाहीर करावी

मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मालवणी भाषिकांसाठी एक उत्सव ठरावा. शासनाने देखील याची दखल घेऊन त्या दिवशी सुट्टी जाहीर करावी. किंवा शासकीय पातळीवर हा दिवस साजरा करावा अशी विनंती या निमित्ताने रिल्स मालवणी यांच्या वतीने तेजस मसके यांनी संबंधितांना केली आहे.

या पत्रकार परिषदेला तुषार तळकटकर, निलेश गुरव, तेजस मसके, रुचिता शिर्के, चांदणी कांबळी, सचिन कोंडसकर, रामचंद्र आईर, हर्षवर्धन जोशी, विठ्ठल तळवलकर, किशोर नाईक, ओंकार मसके उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा