You are currently viewing जि. प. प्रा. शाळा शिडवणे कोनेवाडी येथे स्वच्छता कार्यक्रम संपन्न…

जि. प. प्रा. शाळा शिडवणे कोनेवाडी येथे स्वच्छता कार्यक्रम संपन्न…

वैभववाडी

दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती यानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे कोनेवाडी येथे स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला त्यावेळी सभोवतालची सर्व फाई रान काढणे, अनावश्यक झाडे तोडणे, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष साक्षी चव्हाण, तसेच ग्रामस्थ शिक्षक वृंद उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे कोनेवाडी साठी वाडीतील लोक कोणत्याही कामासाठी आवडीने सहभागी होतात, शाळेतील विद्यार्थ्यांना वेळोवेळी सहकार्य करतात. कोणताही उपक्रम हाती घेतला की लोक अत्यंत तळमळीने माझी शाळा या आपुलकीने समरस होऊन काम पूर्णत्वास नेतात. म्हणून शाळेचे मुख्याध्यापक  प्रशांत कुडतरकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत वरील कार्यक्रमासाठी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार यांनी आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक पाटणकर तथा उपसरपंच यांनी शुभेच्छा दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =