You are currently viewing जानवली पुलानजीक सर्व्हिस रोडवरील पिक अप शेडमध्ये युवकाची आत्महत्या

जानवली पुलानजीक सर्व्हिस रोडवरील पिक अप शेडमध्ये युवकाची आत्महत्या

कणकवली

येथील जानवली पुलानजीक मुंबईच्या दिशेने जाणार्‍या सर्व्हिस रोडवरील पिक अप शेडमध्ये युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी 8 वा. सुमारास उघडकीस आली. युवक पिकअप शेडच्या खिडकीला गळफास घेऊन लटकत असल्याचे पाहून एका नागरिकाने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. युवकाच्या अंगावर पांढरे टीशर्ट व बरमोडा आहे. त्याचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. सकाळी 9.45 वाजेपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा