न्हावेली येथे १७ पासून दशावतारी नाट्यमहोत्सव
सावंतवाडी
उत्कर्ष सेवा मंडळ, कट्टा कॉर्नर, न्हावेलीतर्फे दि. १७ ते २० एप्रिल रोजी नाट्यमहोत्सवाचे दशावतार आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १७एप्रिल रोजी रात्री ९ वाजता (भाई कलिंगण) कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा नाट्यप्रयोग, शुक्रराार, १८ रोजी रात्री ९ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा नाट्यप्रयोग, शनिवार, १९ रोजी रात्री ९ वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्यमंडळ, मातोंड-पेंडुर यांचा नाट्यप्रयोग, रविवार, २० रोजी रात्री ९ वाजता (देवेंद्र नाईक प्रस्तुत) चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भरत धाऊसकर व उपाध्यक्ष लक्ष्मण परब यांनी केले आहे.