You are currently viewing कुडाळ तालुक्यात 7 ठिकाणी कंटेन्मेंट झोन

कुडाळ तालुक्यात 7 ठिकाणी कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी : 

कुडाळ तालुक्यात आंदुर्ले-मुणगी, माईनवाडा, कोरोना बाधित यांच्या राहत्या घराच्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 14 ऑक्टोबर 2020 पर्यंत, रांगणा तुळसुली, ख्रिश्चनवाडी, घर नं. 178 च्या 50 मीटर परिघामध्ये, माणगाव-नमसगाव, नमसवाडी, घर नं. 841 च्या 50 मीटर परिघामध्ये, हुमरस, तेलीवाडी, कोरोना बाधित यांच्या राहत्या घराच्या च्या 50 मीटर परिघामध्ये, दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत, हुमरमळा, पडोसवाडी, कोरोना बाधित यांच्या राहत्या घराच्या 50 मीटर परिघामध्ये, ओरोस, कलेक्टर कॉलनी, टाईप 2/10/3, रानबांबुळी, परबवाडी, विठ्ठल-रखुमाईनगर, घर नं. 825  दिनांक 16 ऑक्टोबर 2020 पर्यंत, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन संबंधित दिनांकापर्यंत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे  यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eleven =