You are currently viewing गृहस्वामीनीस

गृहस्वामीनीस

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना

हे गृह स्वामिनि, मधुर भाषिणी,
सुख संवादिनि शुद्ध मते
झर झर झर हे काम करू दे
ना तरि वदशिल लक्ष कुठे?

हे मृग नयनी, हंस गामिनी
सिंह कटी किति वर्णु तू ते
कधि तरि क्षण भरी कृपा कटाक्षे
लक्ष पामरा वरि असु दे

घरि जरि राहिन काम करिन हे
वचन दिले तुज पाळिन ते
नित्य गोडवे स्मरण असे मज
माहेर चे तव गाईन ते

तू गृहलक्ष्मी, तूच सरस्वती,
तू महा काली शरण तुला
तुझ्या पूजनी नित्य रमावे
सुखात येवो मरण मला

ऎक आरती इतुकी केली
अजुन कशी ग दया न तुला
एक तास की उठून झाला
अजुन कसा चहा न मला?

केला असता तो ही मी जर
अपमानच तव प्रेमाचा
निष्ठुर ना इतुका मी हरण्या
क्षण तोच तुझ्या आनंदाचा

अरविंद १४/४/२०

प्रतिक्रिया व्यक्त करा