You are currently viewing समर्पण

समर्पण

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे लिखीत अप्रतिम काव्यरचना*

वृत्त — वनहरिणी

*” समर्पण”*

स्वर मुरलीचे कानी येता कुंजवनी मी धाव घेतली
नाचत नाचत तालावरती गोप गोपिका रास खेळती ||

कुणा न उरले भान कुणाचे स्वर गुंजन ते धुंद करितसे
तोडुन सारे भावबंध हे तुझ्याकडे मी धाव घेतसे ||

तुझी माधवा ओढ अनावर धावत आले जगा विसरुनी
तुला पाहुनी चैतन्याचा निर्झर झरतो माझ्या मधुनी ||

माझे मी पण तुला समर्पित माझी मी तर उरले नाही
राधा मोहन अद्वैताचे रूप मनोहर जग हे पाही ||

तुटले सारे माया बंधन उन्मुक्त कशी झाली बाधा
कृष्णार्पण हे जीवन केले कृष्णरूप ती होई राधा ||

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 16 =