You are currently viewing महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

 

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब, वैभववाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १ जुलै २०२२ रोजी राज्य कृषी दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात विविध स्थानिक वृक्षांचे रोपन करण्यात आले.


वृक्ष मानवाला प्राणवायू देतात, दगड मारणार्‍याला फळ देतात. आपली मुळं, खोड, छाया, फुले अशी कितीतरी गोष्टी वृक्ष मानवाला देतात. माणसाने वृक्षाकडे उपयुक्ततेच्या दृष्टीने, सौदर्याच्या दृष्टीने न बघता, दैवी दृष्टीने बघितले पाहिजे. वृक्षपूजन हेच ईश्वरपूजन आहे. महाविद्यालयाच्या परिसरातील लावलेल्या या वृक्षातून विद्यार्थ्यांना प्रेरेणा मिळेल, वृक्षाप्रमाणे आपलं जीवनपुष्प फुलत जाईल असे आपल्या प्रस्तावनेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.ए.चौगुले यांनी सांगितले. तसेच आलेल्या पाहुण्यांचे एक-एक झाड देऊन स्वागत केले व महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यास विनंती केली. या वृक्षारोपन कार्यक्रमामध्ये महविद्यालयाच्या परिसारत विविध ठिकाणी झाडे लावण्यात आली.


महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.शैलेंद्र रावराणे, खजिनदार श्री.अर्जुन रावराणे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे, सचिव श्री. प्रमोद रावराणे, महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, तसेच रोटरी क्लब, वैभववाडी शाखेचे अध्यक्ष श्री.संतोष टक्के, सचिव श्री. संजय रावराणे व इतर पधाधिकारी, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवक यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 8 =