You are currently viewing रोटरी क्लब बांदातर्फे शहरातील शाळांना पुस्तके भेट

रोटरी क्लब बांदातर्फे शहरातील शाळांना पुस्तके भेट

बांदा

बंगलोर रोटरी क्लबचे सदस्य व रोटरी फाउंडेशनला १०० कोटी रुपयांची देणगी देणारे रविशंकर डाकोजू यांच्या प्रयत्नातून आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ बांदाने शहरातील विविध शाळांना मौल्यवान पुस्तके भेट दिलीत.

शहरातील व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कुल बांदा, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा, गोगटे वाळके कॉलेज पानवळ-बांदा, दिव्य ज्योती स्कुल डेगवे आणि जिल्हा परिषद केंद्रशाळा क्र १ बांदा यांना बहुउपयोगी इंग्रजी माध्यमाची सुमारे २०० पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, सचिव फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर, सहसचिव शिवानंद भिडे, कार्यक्रम प्रमुख आबा धारगळकर, सदस्य आपा चिंदरकर, सदस्य सचिन मुळीक आदी उपस्थित होते. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा