You are currently viewing सावरवाड येथे पेट्रोल-डिझेल भरलेला टँकर जळून खाक…

सावरवाड येथे पेट्रोल-डिझेल भरलेला टँकर जळून खाक…

मालवण

सांगली येथून चौके येथील पेट्रोल पंप येथे पेट्रोल, डिझेल घेऊन या टँकर पलटी येऊन झालेल्या अपघातानंतर या टँकरने पेट घेतला. या दुर्घटनेत टँकर पूर्णतः जळून खाक झाला. ही दुर्घटना काल मध्यरात्री एक वाजता दरम्यान मालवण कसाल महामार्गावरील सावरवाड येथे घडली. पहाटेपर्यंत आगीचा भडका कायम असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. टँकरमध्ये सहा हजार लिटर पेट्रोल आणि सहा हजार लिटर डिझेल असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य बनले होते. दुर्घटनेत टँकर जळून खाक झाला. अपघातग्रस्त टँकरमध्ये चालक आणि क्लीनर होते यात चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे.

चौके येथील भगवती पेट्रोल पंपाचा टँकर एम.एच.०७ पी-१२१२ हा सांगलीहून चौके येथे पेट्रोल आणि डिझेल घेऊन येत होता. मालवण सावरवाड गणेश मंदिर येथे या टँकरला अपघात झाला. हा टँकर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. यावेळी टँकर मध्ये सहा हजार लिटर पेट्रोल व सहा हजार लिटर डिझेल असल्याने शॉर्टसर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला व टँकरने पेट घेतला. यावेळी मोठ्या स्फोट झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. स्फोट होण्याच्या अगोदर तो बाहेर पडल्याने सुदैवाने बचावला. मात्र यात टँकर जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा