You are currently viewing विधवा प्रथा निर्मूलन ठराव घेणारा कणकवली तालुका राज्यात सर्वप्रथम

विधवा प्रथा निर्मूलन ठराव घेणारा कणकवली तालुका राज्यात सर्वप्रथम

कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची माहिती

कणकवली

महाराष्ट्र सरकारने राज्यातील विधवा प्रथा निर्मूलनासाठी ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीसाठी ठराव घेण्याचे परिपत्रक काढले होते.त्यानुसार कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनासाठी ठराव घेत एक राज्यात आदर्श कणकवली तालुक्याने निर्माण केला आहे. यापूर्वी देखील कणकवली तालुक्याने शासनाच्या विविध उपक्रमांत बहुमान पटकावलेले आहेत,अशी माहिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी दिली.
कणकवली तालुक्याने विशेष ग्रामसभा घेण्याचे नियोजन केलं होतं. त्यानुसार सर्वात प्रथम कणकवली तालुक्यात हुंबरट या ग्रामपंचायत मध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव संमत करण्यात आला.हजारो वर्षांपासून ही प्रथा असल्याने जनजागृती करत तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी यांनी ठराव संमत करत पहिले पाऊल यशस्वी टाकलं आहे. महाराष्ट्र राज्यात तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत मध्ये विधवा प्रथा बंदी संदर्भात ठराव घेणारी कणकवली पंचायत समिती प्रथम आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यापूर्वी कणकवली तालुक्याने हागणदारीमुक्त, पर्यावरण संतुलित ग्राम, लोकराज्य,तंटामुक्त, यशवंत पंचायतराज अभियानात यश संपादन केले आहे.आता विधवा प्रथा बंदी करण्यासाठी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिकांनी व पत्रकारांनी जनजागृती केल्याने यश मिळाले,असल्याचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा