You are currently viewing शिवसेना घावनळेच्या वतीने कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवसेना घावनळेच्या वतीने कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य*

*आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती*

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना घावनळेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत १० वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर आशासेविका, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच छत्री वाटप करण्यात आले.

वाडोस मध्ये १० वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महादेवाचे केरवडे येथे कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वसोली येथे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके देण्यात आली.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, विभागप्रमुख रमा धुरी, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, पंचायत समिती सदस्या मथुरा राऊळ, सरपंच राजश्री घावनळकर, उपसरपंच दिनेश वारंग, प्रभाकर वारंग, पप्पू म्हाडेश्वर, बाबी भिंगारे, प्रशांत घावनळकर, दीपक सावंत, संतोष गावडे, संतोष नागवेकर, मंगेश पार्सेकर, प्रशांत घावनळकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 8 =