You are currently viewing दोडामार्ग शिंदे सेनेचा जल्लोष

दोडामार्ग शिंदे सेनेचा जल्लोष

दोडामार्ग :

 

राज्यात लक्ष लागून राहिलेल्या ऐतिहासिक निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शिंदे सेनेतील आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा जल्लोष साजरा करत आहेत. त्याचीच प्रचिती गुरुवारी दोडामार्ग तालुक्यात आली. दोडामार्ग शिवसेना कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवत येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार मंत्री दीपक केसरकर यांचा जयजयकार करत विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या. दोडामार्ग शिवसेना समर्थकांनी फटाके फोडून व घोषणा देत पेढे वाटून निकालाचा आनंद साजरा केला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तुकाराम बेर्डे, जिल्हा समनव्यक शैलेश दळवी, युवा सेना तालुकाप्रमुख भगवान गवस, रामदास मेस्त्री, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, मायकल लोबो, तिलकांचन गवस, महिला तालुका प्रमुख चेतना गडेकर, उपजिल्हाप्रमुख मनीषा गवस, शहरप्रमुख शीतल हरमलकर, उपतालुकाप्रमुख सानवी गवस, सवीता नाईक, गुणवंती गावडे, प्रांजल गवस, गुरुदास सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 14 =