You are currently viewing उसप सरपंच यांना पदावरून काढून टाकण्याचा कोकण आयुक्तांचे आदेशाला स्थगिती..

उसप सरपंच यांना पदावरून काढून टाकण्याचा कोकण आयुक्तांचे आदेशाला स्थगिती..

दोडामार्ग :

 

दोडामार्ग तालुक्यातील उसप सरपंच दिनेश नाईक यांना कोकण आयुक्त‌ यांच्या कार्यालयाकडून दिनांक २२ जून २०२२ रोजी पदावरुन काढून टाकण्याचे‌ आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध दिनेश नाईक यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (३) नुसार मा.मंत्री (ग्रामविकास) यांच्या न्यायालयात‌ अपिल दाखल केले होते. त्या नुसार त्याच्या आदेशाला स्थगीती मिळाली आहे त्यामुळं त्यांना अता अभय मिळाले आहे.

दोडामार्ग तालुक्यातील बहुचर्चित उसप ग्रामपंचायत सरपंच दिनेश अंनत नाईक यांनी रहिवाशी दाखला देऊन दिनांक १३/०२/२०१९ रोजीच्या शासन परिपत्रकाचे उल्लंघन करून महाराष्ट्र ग्रामंचायत अधिनियम (१९५९चा मुंबई अधिनियम क्र.३) कलम ३८ नुसार सरपंच ग्रामपंचायत उसप यांनी कर्तव्यात कसूर केली आहे या मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुुदुर्ग यांचे अहवालाशी सहमत असल्याने त्यानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून श्री दिनेश अंनत नाईक,सरपंच, ग्रामपंचायत उसप ता.दोडामार्ग जि.सिंधुदूर्ग यांना काढून टाकण्याचे आदेश विलास पाटील कोकण आयुक्त नवी मुंबई यांनी पारित केलेल्या आदेश म्हटले होते.

याबाबतीत उसप गावातील माजी जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी सरपंच प्रकाश गवस अन्य पाच जणांनी सरपंच विरोधात रहिवाशी दाखला दिला त्यावरून तक्रार दीली होती यांची दखल घेत प्रशासनाने चौकशी करूनच अहवालानुसार कारवाई करण्यात आली होती याबाबत सरपंच यांनी आपणास नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून आपणही यापुढे विकास कामे सुरू ठेवणार असून योग्य वेळी भूमिका घेणार असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 8 =