वेंगुर्ला :
वेंगुर्ला येथे २ जुलै रोजी सकाळी १० वाजता फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्ले व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने फलोद्यान विषयाचे विद्यार्थी व शेतकरी यांच्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती व कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरात तालुका कृषी विभागाचे अधिकारी शासनाच्या विविध योजनांची माहिती देणार आहेत. तर प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच फलोद्यान विषयाच्या विद्यार्थ्यांना क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी या विषयावर प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन. सावंत मार्गदर्शन करणार आहेत. बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. सुनील भिसे छत्रपती शाहू महाराजांचे कृषी धोरण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शन शिबिरास सर्व शेतकरी व फलोद्यान चे विद्यार्थी आणि उपस्थित रहावे, असे आवाहन फुले,शाहू,आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर व सचिव के.जी. गावडे यांनी केले आहे.