You are currently viewing शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

अजुनही वेळ गेली नाही, भाजपाशी युती करा..

दीपक केसरकर यांची उद्धव ठाकरे यांना विनंती

अजून वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी युती करावी, आणि महाराष्ट्राला चांगले सरकार द्याव, अशी विनंती एकनाथ गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पुन्हा केली आहे. राष्ट्रवादी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करतय, हे लक्षात घ्या असेही केसरकर म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्ष करून शिवसेना उभी केली. आता संघर्ष करावा लागू नये, महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करते. त्यांच्या प्रेमापोटीच मी शिवसेनेत आलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. अजुनही वेळ गेली नाही. आपण भाजपसोबत सरकार स्थापन करू, भाजपसोबत युती व्हावी,हीच आमची भूमिका आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा