You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला

श्री पंचम खेमराज महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे २१ जून २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल , योग प्रशिक्षिका सौ समीक्षा भानुशाली , एन एस एस समन्वयक डॉ डी जी बोर्डे, डॉ यूसी पाटील, प्रा.सौ एस जे जाधव, एनसीसी आर्मी चे प्राध्यापक एस ए देशमुख
नेव्हल युनिटचे डॉ व्ही टी अपराध ,प्राध्यापिका सौ कविता तळेकर हे उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली .एन एस एस समन्वयक डॉ देविदास बोर्डे यांनी संत कबीरांच्या विचारांचा संदर्भ देऊन मन आणि शरीर यांचा मेळ घालून शरीर सामथ्र्य वाढवावे तसेच भारतीय परंपरेने कशाप्रकारे योगाची निर्मिती केली याबद्दल माहिती दिली . योग प्रशिक्षक सौ समीक्षा भानुशाली यांनी योगाबद्दल सविस्तर माहिती देऊन त्याचे महत्त्व विशद केले .वयावेळी त्यांच्या सहकारी कविता सावंत, नीलम पवार , गौतमी गावडे यांनी योग प्रात्यक्षिके केली . या कार्यक्रमामध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल एनसीसी प्रमुख श्री मुठे व त्यांचे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला तसेच उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी यांनी योगामध्ये सहभाग घेतला . या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा. सचिन देशमुख यांनी मानले .

प्रतिक्रिया व्यक्त करा