सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान तर्फे सावंतवाडी रक्तपेढीला फोल्डिंग कॉट प्रदान

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान तर्फे सावंतवाडी रक्तपेढीला फोल्डिंग कॉट प्रदान

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान चा पुढाकार

सावंतवाडी :

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडी येथील रक्तपेढीला फोल्डिंग कॉट देण्यात आली. प्रतिष्ठानच्या मार्फत जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

ग्रामीण भागात शिबिर राबविताना रक्तदात्यांना कॉटची कमतरता जाणवते. यासाठी जिल्ह्यातील रक्तदान चळवळीत कार्यरत असलेल्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने कॉट देणगी देण्याचा निर्णय घेतला.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर, कार्यकारिणी सदस्य व सावंतवाडी तालुका प्रतिनिधी एकनाथ चव्हाण, दिलीप मालवणकर, महेश शिरोडकर, यशवंत गावडे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. बागवान, अनिल खाडे, श्रीमती बागेवाडी आदी उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी या देणगी बद्दल आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा