सावंतवाडी
चक्कर येऊन कोसळल्याने येथील कळसुलकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याचे निधन झाले आहे. त्याला उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्याची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कौस्तुभ प्रवीण पेडणेकर (वय १८, रा. खासकीलवाडा, मुळ रा. शिरशिंगे, ता सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. ही दुःखद घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील सबनीसवाडा चढावावर घडली. त्याठिकाणी तो चक्कर येऊन बेशुद्ध पडला. यावेळी त्याला अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्याचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतची माहिती प्रशालेच्या शिक्षिका प्रीती चिटणीस यांनी दिली.
कौस्तुभ हा बारावी कॉमर्समध्ये शिकत होता. त्याचा स्वभाव मनमिळावू होता, अभ्यासात हुशार होता, त्याचे वडील कोल्हापूर येथे एका हॉटेलमध्ये काम करतात. तर त्याला छोटी बहिण आहे. गावात अडचणी असल्यामुळे त्याचे कुटुंब शहरात येऊन वास्तव्यास राहिले होते.