You are currently viewing छ.शाहू महाराज पुरोगामी सुधारक- प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे

छ.शाहू महाराज पुरोगामी सुधारक- प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे

वैभववाडी

महाराष्ट्र ही सुधारकांची भुमी असून येथे अनेक सुधारक होऊन गेले. या सर्वांमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करणारे कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्षी छ.शाहू महाराज हे पुरोगामी सुधारक होते असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी सांगितले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छ. शाहू महाराज यांची १४८ वी जयंती कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.


२६ जून हा छ.शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. डॉ.काकडे यांनी
छ.शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन शाहू महाराजांचे पुरोगामी विचार आज सर्वांनी स्वीकारण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा.डॉ.आर.एम‌.गुलदे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणांचा आढावा घेतला तर प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी शाहू महाराजांचे स्त्रियांच्या कल्याणाचे कार्य याबाबत आढावा घेतला. सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते राजर्षी छ.शाहू महाराज प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डी.एस. बेटकर यांनी केले तर आभार डॉ. विजय पैठणे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा