शिवसैनिकाला अटक
सावंतवाडी :
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गोटात सामील झालेले सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंट येथील निवासस्थान आणि कार्यालयाच्या आत एका अज्ञात युवकाने दगड मारल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा घडली. दरम्यान, दंगल पथक व पोलिसांच्या समक्षच ही घटना घडली असून सदर युवकाला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. संबंधीत तरुण कणकवली कलमठ येथील असल्याचे समजते.