You are currently viewing २५ जून रोजी दशावतार क्षेत्रातील तिन्ही पिढ्या एकाच रंगमंचावर

२५ जून रोजी दशावतार क्षेत्रातील तिन्ही पिढ्या एकाच रंगमंचावर

“नितीन आसयेकर फॅन क्लब” या ग्रुपच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त नाट्यप्रयोग “महारथी कर्ण”

कुडाळ :

“नितीन आसयेकर फॅन क्लब” या ग्रुपच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक २५ जून २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता वासुदेवानंद ट्रेड सेंटर, उद्यम नगर, कुडाळ येथे वर्धापन दिन सोहळा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित दशावतारी कलाकारांच्या संचात महारथी कर्ण या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

या नाट्य प्रयोगात दशावतार क्षेत्रातील तिन्ही पिढ्या एकाच रंगमंचावर अभिनयाचा आविष्कार साकारणार आहे.

या कार्यक्रमाला सर्व दशावतार नाट्यप्रेमी, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नितीन आसयेकर फॅन क्लब करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − four =