You are currently viewing सावंतवाडीत शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

सावंतवाडीत शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

सावंतवाडी

सावंतवाडी शेजारच्या एका गावात अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. चारचाकी वाहनातून आलेल्या काहींनी शाळेत जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने अपहरण करणाऱ्याच्या हाताचा चावा घेत सुटका करून घेतली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शाळेत जाऊन तिने हा प्रकार शिक्षकाना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलिसांनी नाकाबंदी करत अपहरणकर्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुलीसह तिच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा