You are currently viewing अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” ९ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” ९ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवार आता दुसरे उपमुख्यमंत्री

मुंबई

राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे – फडणवीस सरकारला पाठींबा दिला आहे. राजभवनावर झालेल्या विशेष सोहळ्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित दादांसमवेत आलेल्या एकूण ९ जणांनी यावेळी मंत्री पदाची शपथ घेतली.

यामध्ये स्वतः अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रिफ, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आठ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा