You are currently viewing जल जीवन मिशन अंतर्गत  जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकासाठी कार्यशाळा

जल जीवन मिशन अंतर्गत  जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकासाठी कार्यशाळा

जल जीवन मिशन अंतर्गत  जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकासाठी कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी,   

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 जल जीवन मिशन अंतर्गत कामाना गती देण्याकरिता  दिनांक 23 व 24 जून रोजी सरपंच व ग्रामसेवक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेकरिता पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील व सल्लागार युनिसेफ मुंबईचे मंदार साठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहवे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले आहे.

            जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुरु असणाऱ्या कामांना गती देण्याकरिता देवगड, वैभववाडी, कणकवली व मालवण  तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांना  कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे दि.23 जून 2022 रोजी सकाळी  10 ते 4.30  वाजता या कालावधीत कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे.सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व वेंगुर्ला या तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी सावतवाडी येथील भगवती मंगल कार्यालय मळगाव येथे दिनांक 24 जून 2022 रोजी सकाळी 10 ते 4.30 वाजता कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

यावेळी तांत्रिक व प्रशासकीय माहिती, मंदार साठे उपस्थित सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना देणार आहेत. ग्रामपंचयात कार्यक्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या  अडचणी बाबत सरपंच ग्रामसेवक यांच्याशी थेट संवाद करण्यात येणार आहे. तर जल मिशन अंतर्गत सरपंच व ग्रामसेवक यांची भूमिका व जबाबदारी याबाबत पाटोदा माजी सरपंच भास्कर पेरे पाटील हे मार्गदर्शन करतील. या  कार्यशाळेत उपस्थिताना जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रजित नायर हे मार्गदर्शन करणार आहेत.  तरी जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहवे असे आवाहन ही श्री. ठाकूर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा