You are currently viewing कोव्हिडच्या काळात विधवा झालेल्या महिलांचे सर्वेक्षण करा – जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी

कोव्हिडच्या काळात विधवा झालेल्या महिलांचे सर्वेक्षण करा – जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी

कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या महिलांचे सर्वकष सर्वेक्षण करा अश्या सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिल्या.

कोरोना महामारीमुळे ज्या महिला विधवा झाल्या आहेत. त्यांच्या कौटुंबिकदृष्टया विचार करता त्यांना मिळणारे लाभ तसेच मिशन वात्सल्यअंतर्गत देण्यात येणारे लाभ याबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा परिषदेकडील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविका, विधवा महिलांचे सर्वेक्षण 30 जून अखेरपर्यंत पूर्ण करावे.

सर्वेक्षण करताना कोव्हिड 19 महिलांना शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या 24 प्रकारच्या योजनांच्या लाभाविषयीची प्रश्नावली द्यावी. ही माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे संकलित केल्यानंतर यादी जिल्हा परिषद, उद्योग विभाग, कौशल्यविकास विभाग, कृषी विभाग, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी पाठवावी. पात्रतेनुसार महिलांना योजनांच्या व प्रशिक्षणाचा लाभ द्यावा. ज्या विधवा महिलांना नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करावयाचा आहे. त्यांनी अग्रणी बँक व अन्य बँकांकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून घ्यावे. या सर्वेमध्ये विधवा महिलांना अंगणवाडी सेविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले.

यावेळी या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, प्रभारी जिल्हा कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, कौशल्यविकास रोजगार अधिकारी ग प्र. बिटोडे, जिल्हा उद्योग केंद्राची श्रीपाद दामले, तंत्रशिक्षणाधिकारी ए. एल. नातू, महिला आर्थिक विकास मंडळाचे नितीन काळे, अग्रणी बँकेचे मुकेश मेश्राम, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी. काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, संरक्षण अधिकारी संस्थात्मक काळजी उदय मालवणकर तसेच सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =