You are currently viewing निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत ६३ टी.एस.आर कमांडोंची हजेरी…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत ६३ टी.एस.आर कमांडोंची हजेरी…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत ६३ टी.एस.आर कमांडोंची हजेरी…

सावंतवाडी पोलिसांसह पथक संचालनाद्वारे कमांडोंचे शहरात शक्ती प्रदर्शन…

सावंतवाडी

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सावंतवाडी शहरात त्रिपुरा स्टेट रायफल्स टी.एस.आरच्या ३ अधिकाऱ्यांसह ६० कमांडो दाखल झाले आहेत. यांच्या माध्यमातून आज सायंकाळी शहरातून सावंतवाडी पोलीस व टी.एस.आर पथकाकडून पथक संचालनाद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, प्रमोद पाटील, माधुरी मुळीक, एन.आर नरळे व टी.एस.आर पथक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक संचालन करण्यात आले.

निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता म्हणून त्रिपुरा येथून या कमांडोंना या ठिकाणी बोलवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी दिली. दरम्यान लोकसभा निवडणूक होईपर्यंत टी.एस.आर पथकाचे अधिकारी व कमांडो सावंतवाडीत मुक्कामाला असणार आहेत, त्यांच्या राहण्याची सोय माजगाव येथील डि.के.टुरिझम या ठिकाणी करण्यात आली आहे. असे श्री. नारनवर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा