सावंतवाडी :
देवसु गावतील गुणवंत विद्यार्थिनी मनली मनोहर सावंत, सिद्धी लक्ष्मण सावंत आणि उर्वी उमेश सावंत यांनी माध्यमिक शालांत सन्मानित घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल आज भारतीय जनता पार्टी देवसु द्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विभागीय अध्यक्ष रुपेश सावंत, बुथ अध्यक्ष अशोक सावंत, वाय. डी. सावंत, अमोल सावंत, प्रकाश सावंत, महेश सावंत, शांताराम सावंत, मंगेश परब, श्रीकृष्ण सावंत, जयवंत सावंत, मनोहर सावंत, लक्ष्मण सावंत, महिलावर्ग तसेच उपस्थित सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.