You are currently viewing तळवडेत शारदा विद्यामंदिर शाळा नं. ४ मध्ये “पेड लागाओ धरती बचाओ” अभियान

तळवडेत शारदा विद्यामंदिर शाळा नं. ४ मध्ये “पेड लागाओ धरती बचाओ” अभियान

MCL कंपनी अंतर्गत “श्री एकदंत प्रोड्युसर कंपनी लिमिटेड – कुडाळ” यांच्या मार्फत अभियानाची सुरवात

सावंतवाडी :

 

MCL कंपनी अंतर्गत “श्री एकदंत प्रोड्युसर कंपनी लिमिटेड – कुडाळ” यांच्या मार्फत “पेड लागाओ धरती बचाओ” अभियानाची सुरवात तळवडे (सावंतवाडी) गावच्या शारदा विद्यामंदिर शाळा नंबर ४ मधून झाली.

या अभियानाला श्री एकदंत प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक प्रज्ञा सत्यविजय भैरे व प्रशांत भालेराव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.केसरकर, सहशिक्षक सौ. गवंडळकर, श्री.नाईक, श्री. कवठणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.हरी परब, तळवडे सोसायटी चेअरमन श्री.आपा परब, ग्रा.सदस्य सौ.अंकिता भैरे, पालक,  ग्रामस्थ श्री.ज्ञानेश्वर बर्डे, श्री. रामा भैरे, श्री.सुनील घोनसेकर, श्री. प्रसाद सावंत, श्री.चंद्रकांत परब, श्री.जनार्दन भैरे, श्री.जीजी परब, सौ.पुष्पा गावडे, नमिता सावंत व तळवडे गावचे उद्याचे भविष्य घडवणारे शाळेची लाडकी मुले आदी उपस्थित होती.

या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येकाने किमान एक तरी झाडं घराजवळ किंवा उपलब्ध जागेत लावावे व त्याचे मनापासून संगोपन करावे. शिवाय सजीव सृष्टीचं अस्तित्व अनंत काळापर्यंत टिकवून ठेवायचे असेल, तर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाला दुसरा पर्याय नाही. झाडांचं मूल्य समजून घ्या… आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर, डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या…. या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा, असा संंदेश यावेळी अभियानातून देण्यात आला.

तसेच झाड माणसाचे मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात, असा संदेश देण्यात आला. मुलांना झाडे लावण्याची व संगोपन करण्याची आवड निर्माण करणे. तसेच आपण लावलेल्या झाडांची फळे इतरांनाही चाखता यावी अशी उदार भावना जोपासावी. तसेच एकमेकांविषयी सलोखा व प्रेम वाढावा आणि पर्यावरणविषयक जागृत करणे असा दुहेरी उद्देश समोर ठेवून अभियान राबवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 17 =