You are currently viewing 23 रोजी कणकवली येथे भाजपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

23 रोजी कणकवली येथे भाजपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

कणकवली :

भारतीय जनता पार्टी कणकवली शहराच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार 23 जून रोजी सकाळी 10 वा.नगर पंचायत बहुउद्देशीय हॉल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहरवासीयांनी तसेच विविध सामाजिक संस्था, व्यक्ती यापैकी ज्यांना रक्तदान करायचे आहे. त्यांनी आपली नोंदणी भाजप जिल्हा कार्यालय कणकवली, अजय घाडीगावकर 9404924354 यांच्याकडे करावी. सद्यस्थितीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्त तुटवडा असुन जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे,असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे व शहराध्यक्ष सुरेंद्र ऊर्फ अण्णा कोदे यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =