You are currently viewing “शंभो जय जय, श्री रवळनाथ” भक्तीगीताचे प्रकाशन राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते

“शंभो जय जय, श्री रवळनाथ” भक्तीगीताचे प्रकाशन राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते

सावंतवाडी :

 

जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या ओटवणे येथील श्री देव रवळनाथावर जेष्ठ कवी कृष्णा देवळी यांच्या माध्यमातून “शंभो जय जय, श्री रवळनाथ” हे भक्तीगीत काढण्यात आले आहे. या गिताचे प्रकाशन सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी हे गीत गावाचा इतिहास आणि ऐतिहासिक परंपरा अजरामर करण्यासाठी प्रयत्नशील ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, मानकरी एकनाथ गावकर, बाबाजी गावकर, अण्णा मळेकर, ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सरचिटणीस रामचंद्र गावकर, उपसरपंच संतोष कासकर, ओटवणे येथील मंडळाचे समन्वयक दशरथ गावकर, उमेश गावकर, संतोष कविटकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सचिव राजाराम वर्णेकर, रवींद्र म्हापसेकर, मनोहर मयेकर, संजय कविटकर, बाळा गावकर, नरेंद्र कविटकर, रामदास पारकर, बाबी देवळी, दत्ताराम गावकर, शेखर गावकर, सुनिल मेस्त्री, प्रभाकर गावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा