You are currently viewing धनगर समाजातील विद्यार्थांसाठी वसतीगृह योजना

धनगर समाजातील विद्यार्थांसाठी वसतीगृह योजना

सिंधुदुर्गनगरी

राज्य शासनाने धनगर समाजातील वसतीगृहापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना लागू केली आहे. जिल्हृयातील धनगर समाजातील जे विद्यार्थी वसतीगृहापासून वंचित राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांनी या स्वतंत्र योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

विद्यार्थी धनगर समाजातील असावा. अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा. पालकाचे उत्पन्न 2.50 पेक्षा जास्त नसावे. केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल. त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.  स्वत:चा आधार क्रमांक,राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न असवा. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील रहिवाशी नसावा. विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी महाविद्यालयीन उपस्थिती 60 टक्के असावी. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. या योजनेचे  अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातून देण्यात येतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा