You are currently viewing अस्तित्व

अस्तित्व

**जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अस्तित्व*

 

वाऱ्यावर हलणारे टवटवीत पान

कोमेजून थांबावे उन

तशी अवस्था मनाची

सर्वत्र उन्हाची कलकल

आणि दूरपर्यंत भकास शांतता

एकाएकी दाटून आलेलं

आभाळ उदास झालेलं

 

 

पाखरांचं गाणं नाही

वाऱ्याचं येणं नाही

ओसाड शेतातील भणभण

तसं वाटू लागलंय

हे आस्तित्व

 

 

पण या पानझडीतही

माझी पडझड होणार नाही

यासाठी झुंजत राहीन मी

या जीवघेण्या परिस्थितीशी

 

 

काळोखाला मिटवत

ऊन वारा हटवत

मी चालत जाणार आहे

उदासवाण्या रानातून

जीवनगाणे गाणार आहे

 

 

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा