You are currently viewing सिंधुदुर्गात मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन…

सिंधुदुर्गात मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन…

ईडीचा सहारा घेऊन राहुल गांधींची छळवणूक नको; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन…

सिंधुदुर्गनगरी

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची इडीचा सहारा घेऊन मोदी सरकार मार्फत होणारी छळवणूक ताबडतोब थांबविण्यात यावी. या मागणीसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.

कॉंग्रेस पक्षाचे देशातील वरिष्ठ नेते आणि भारतातील गोरगरिब जनता, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, छोटे उद्योजक, नोकरवर्ग, मध्यम वर्गीय जनता, शोषित, पिडीत या सर्वांचा आवाज बनून केंद्र सरकारच्या अन्यायाविरुद्ध आणि देशाला खड्ड्यात घालणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत आहेत . राहुल गांधी यांनी गेल्या आठ वर्षात जे काही सांगीतले ते खरे होताना दिसत आहे . केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज देश अधोगतीला जात आहे . कधी नव्हे एवढी प्रचंड महागाई वाढली आहे , बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला आहे , देशाचा जीडीपी कमी झाला आहे , डॉलरचे अवमूल्यन कधीही झाले नव्हते एवढे झाले आहे. प्रत्येक आघाडीवर हे सरकार अपयशी ठरले आहे . आता लोकसभा निवडणुकीला दोन वर्षे सुद्धा राहिलेली नाहीत . राहुल गांधी आपल्या अपयशाचा पाढा लोकांसमोर मांडून आपल्याला नामोहरम करतील . देशातील जनता पुन्हा काँग्रेसचे पूर्वीचेच दिवस चांगले होते असे म्हणायला लागली आहे त्यामुळे केंद्र सरकारचे प्रमुख असलेल्या मोदीना आपली सत्ता जाण्याची भीती वाटायला लागली आहे. म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वावर कारवाई करण्याचे नाटक करून देशातील जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे .याचा तीव्र निषेध करण्यासाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले.या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी साईनाथ चव्हाण, विकास सावंत, नागेश मोर्ये, अरविंद मोडकर ,साक्षी वंजारे, प्रकाश जैतापकर,विलास गावडे आदींसह मोठ्या संखेने कॉंग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या पार्ष्वभूमिवर सिंधुदुर्गनगरित मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगल पथकही तैनात ठेवण्यात आले होते.

केंद्र शासनाने ज्या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांची इढी मार्फत रोज चौकशी करून छळवणूक सुरु केली आहे . त्या प्रकरणात यापूर्वीच अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. मग ही चौकशीची नोटकी कशासाठी ? हे नॅशनल हेराल्ड प्रकरण म्हणजे असोसिएटेड जनरलस लिमिटेड ही वृत्तपत्र चालवणारी • संस्था पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यापूर्वी काढलेली संस्था या संस्थेमार्फत काढली जाणारी वृत्तपत्रे ही त्या काळात देशातील जनतेचा आवाज बनली होती . स्वातंत्र्य लढ्याचे ते एक प्रमुख होते . स्वातंत्र्या नंतरच्या काळात कालांतराने असोसिएटेड जनरलस लिमिटेड ही संस्था आर्थिक अडचणीत आली आणि त्याच्यावर ९० कोटींचा कर्जाचा बोजा झाला . त्यावेळेस यंग इंडिया नामक कंपनीने जी कंपनी कायद्याच्या कलम २५ नुसार स्थापन झालेली म्हणेजच ना नफा ना तोटो या धर्तीवर चालणा-या कंपनीने असोसिएटेड जनरलस लिमिटेड च्या कर्जाला इक्विटी शेअर्स मध्ये परावर्तित करून ते यंग इंडिया कंपनीने घेतले. या मध्ये कोठेही पैश्याचा व्यवहार झाला नाही .तसेच यंग इंडिया ही कंपनी फायदा कमवणारी कंपनी नसल्यामुळे यंग इंडिया कंपनीच्या संचालकांना आर्थिक फायदा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी मनीलान्ड्रींगचा तपास करणा-या इडी मार्फत चोकशी करून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची छळवणूक केली जात आहे . तरी हे ताबडतोब बंद करावे. अशी मागणी जिल्हाधिकारी याना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रमुख म्हणून केंद्र सरकारकडेआमची मागणी पोहोचवावी. असे निवेदनात नमूद केले आहे.यावेळी कॉंग्रेस शिस्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 6 =