मालवण
मालवण शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी घरफोडी झाली आहे. शहरातील मेढा, बाजारपेठ परिसरात बंद असलेली तीन घरे चोरट्यांनी फोडली असून यामध्ये एका घरातील दागिने चोरीला गेल्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. चोरटा माहितगार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परब, नेवगी, पालव यांच्या घरात ही चोरी झाली आहे. पोलीसांकडून ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.