You are currently viewing शिक्षक उपस्थितीबाबत स्वयंस्पष्टता आदेश काढण्यासाठी शिक्षक भारती आक्रमक!

शिक्षक उपस्थितीबाबत स्वयंस्पष्टता आदेश काढण्यासाठी शिक्षक भारती आक्रमक!

शाळांना सुचना न दिल्यास १५ ऑगस्ट रोजी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसणार!

तळेरे: प्रतिनिधी

माध्यमिक शाळेतील शिक्षकांची उपस्थितीवरुन शिक्षक भारती पुन्हा आक्रमक झाली असून लेखी आदेश काढण्यासाठी संघटनेने स्वातंत्रदिनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
आजच्या स्थितीला दहावी बारावी वर्गाचे निकाल कधीच जाहीर झाले तरीही बहुतांश माध्यमिक शाळातील दहावी बारावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शाळेत १००टक्के उपस्थितीचा आग्रह शाळा स्तरावरून केला जात आहे. शिक्षक-शिक्षकेतर यांच्या उपस्थितीबाबत जिल्ह्यात कुठेही एकवाक्यता आढळून येत नाही.
संघटनेच्या मते ‘आम्हाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100% उपस्थितीबाबत कोणतीही हरकत नाही. पण,एकतर ५० टक्के उपस्थिती अथवा १०० टक्के उपस्थितीचे निश्चित धोरण शिक्षण विभागाने ठरवून जिल्हाभर एक वाक्यता आणावी अशी ठोस मागणी संघटनेने केली आहे.तसेच यासंदर्भात
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट लेखी आदेश काढून जिल्हाभर शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्माण झालेला संभ्रम दुर करावा.या मागणीसाठी संघटनेच्यावतीने क्रांतीदिनी जि.प कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.
मात्र, शिक्षण विभागाकडून लेखी अथवा तोंडी अशा कोणत्याही प्रकारचे आश्वासन न मिळाल्याने येत्या15 ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्यदिनी पुन्हा आंदोलन हत्यार उपसणार संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
आज दि.10आॅगस्ट रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची शिक्षक भारती या शासनमान्य संघटनेच्यावतीने श्री संजय वेतुरेकर,सचिव श्री.सुरेश चौकेकर आणि राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.सी.डी.चव्हाण यांनी भेट घेतली असता सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 15 =