You are currently viewing सांगेली शाळेचा 100 टक्के निकाल

सांगेली शाळेचा 100 टक्के निकाल

सावंतवाडी :

माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, सांगेलीचा ईयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून ईशा रामनाथ सांगेलकर (९४.४०) टक्के गुण मिळवून प्रशालेतून पहिला येण्याचा मान मिळविला. तर ऐश्वर्या प्रमोद परब (९३.४०) द्वितीय, सविता मळू डोईफोडे (८८.६०) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

परीक्षेसाठी विद्यालयातून 41 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला. त्यापैकी 19 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 20 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर उर्वरीत 02 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. सर्व यशस्वी विद्यार्थांना संस्था अध्यक्ष श्री पंढरीनाथ पुनाजी राऊळ, सचिव श्री विश्वनाथ रामचंद्र राऊळ, प्राचार्य श्री रामचंद्र दशरथ घावरे आणि सर्व संस्था पदाधिकारी सर्व शाळा समिती सदस्य सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + fourteen =