You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील नूतनीकरणाचे काम वादात…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील नूतनीकरणाचे काम वादात…

राष्ट्रवादी आक्रमक; फरशांवर-फरशा बसवल्याचा आरोप, काम पाडले बंद…

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेले नुतनीकरणाचे काम वादात सापडले आहे. त्या ठिकाणी फरशांवर फरशा बसवण्यात आल्या असून शौचालय आणि स्वच्छतागृहाची परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान हे काम निकृष्ट आहे. त्याचा दर्जा तपासावा, अन्यथा काम होऊ देणार नाही, असा इशारा देत त्यांनी हे काम बंद पाडले. युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली.
यावेळी युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, पदवीधर संघ तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी, माजी नगरसेवक सुदनवा आरेकर, नागेश नाईक, संतोष जोईल, नारायण आकेरकर, बंड्या आरेकर, शेलटन नूरनार, हर्षद बेग, अभिजित पवार, नितीन सातपुते, शरद जामदार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 18 =