डाॅ.अमेय देसाई , सहसंयोजक भाजपा प्रदेश वैद्यकीय आघाडी.
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३० मे २०२२ रोजी २०१४ ते २०१९ या पाच वर्षाचा कालावधी धरुन ८ वर्षे पुर्ण झाली .
मोदी सरकारची कामगीरी जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये मोदी सरकारच्या योजनांच्या लाभार्थांशी संपर्क साधला जात आहे . तसेच पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली जात आहे .
देशाचा विकास आणि प्रत्येकाच्या प्रगतीचा ध्यास हेच सत्तेचे ध्येय समजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात देशात एक सुवर्णकाळ सुरू केला . देशाच्या महान परंपरांची प्रगतीशी सांगड घालत देशाला संपुर्ण जगात एक नव्या आदराचे स्थान मिळवून दिले , आधुनिक प्रगतीची कास धरता येते , हे दाखवून देत सुशासनाचा एक नवा आदर्शही निर्माण केला .
गरीब कुटुंबाना तर एखाद्याचे आजारपण आणि औषध उपचारांचा खर्च म्हणजे फार मोठे संकट . घरातील कर्त्या माणसाला हाॅस्पीटल मध्ये दाखल करावे लागले तर संपुर्ण कुटुंबाच्या अडचणीत वाढ होते . वैद्यकीय उपचारांवरील खर्चांमुळे भारतात दरवर्षी सहा कोटी लोक गरीबीत ढकलले जातात, असे पहाणीत आढळून आले आहे . म्हणुनच सामान्य भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी *प्रधानमंत्री जन आरोग्य योजना* नावाची एक अत्यंत प्रभावी योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून सुरू केली आहे . या योजनेच्या लाभार्थी कुटुंबाना दरवर्षी पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले जातात . मोदी यांच्या इतर गरीब कल्याण योजनेप्रमाणेच या योजनेचेही जबरदस्त वेगाने अंमलबजावणी सुरू आहे . दि २ फेब्रुवारी २०२२ पर्यंत या योजनेत २ कोटी ६१ रुग्णांना हाॅस्पीटल मध्ये दाखल करुन त्यांच्यावर मोफत उपचार केले गेले आहेत . विशेष म्हणजे ही मोफत उपचारांची सुविधा सरकारी रुग्णालयाप्रमाणे खासगी रुग्णालयामध्येही उपलब्ध आहे .
*आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना* ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे . या योजनेतून देशातील १० कोटी ७४ लाख कुटुंबांना म्हणजे अंदाजे ५० कोटी लोकांना मोफत वैद्यकीय उपचारांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे .
*प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना* —-
विशेष केंद्राद्वारे सामान्य जनतेस परवडणारया किंमतीत दर्जेदार औषधे पुरवीणारा एक स्त्युत्य उपक्रम , याद्वारे ब्रँडेड औषधाहुन कमी किंमतीत जेनेरीक औषधे उपलब्ध करून दिली जातात .
आज देशात ८५०० पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रे सुरू आहेत .महिलांसाठी एक रूपयांमध्ये सॅनीटरी नॅपकीन देखील या केंद्रावर मिळते .जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून ८०० कोटीहुन अधिक औषधांची विक्री झाली आहे . कोरोनाच्या काळात गरीब व मध्यमवर्गीयांचे सुमारे १३ हजार कोटी रुपये जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून वाचले आहेत .
मोदी सरकारने *पंतप्रधान राष्ट्रीय डायलीसीस कार्यक्रम* सुरु केला आहे . लाखो गरीबांनी डायलीसीस सेवेचा फायदा घेतला आहे . त्यामुळे गरीबांचे डायलीसीसचे ५५० कोटी रुपये वाचले आहेत .
*”आयुष्यमान भारत डिजिटल मिशन “* साठी १६०० कोटीची तरतूद ————
आयुष्यमान भारत डिजिटल मिशन या केंद्र सरकारच्या योजनेच्या राष्ट्रीय रस्त्यावरील अंमलबजावणीला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली .
तंत्रज्ञान , आरोग्यसेवेपर्यंत पोहोचण्यास सक्षम करण्यात भुमिका बजाऊ शकते हे कोवीन , आरोग्य सेतु आणि ई – संजीवनी यांनी दाखवून दिले आहे . आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ( BDM² ) डेटा , माहिती आणि पायाभूत सुविधा , आरोग्य – संबंधित वैयक्तिक माहिती संरक्षण , गोपनीयता आणि इंटरऑपरेबल , मानक – आधारित डिजिटल सिस्टमच्या विस्तृत तरतुदीद्वारे एक अखंड ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनले आहे .
कोरोनाच्या काळात जगातील मोठ्या मोठ्या देशामध्ये तिथल्या नागरिकांना लसीच्या एक एक मात्रेसाठी हजारो रुपये द्यावे लागले होते .मात्र भारतात कुठल्याही नागरीकाला लसीसाठी एकही पैसा खर्च करावा लागु नये आणि आज देशात *मोफत लसीकरणाचे* हे अभियान यशस्वीपणे राबवीले जात आहे . सरकारने यासाठी ३० हजार कोटी रुपयांहून अधिक पैसा खर्च केला आहे .
मोदी सरकार आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निरंतर मजबूत करत आहे . स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे लोटल्यानंतरही देशात केवळ एकच *एम्स* होते . मात्र आता देशात *२२ एम्स* आहेत .देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असावे असे सरकारचे उदिष्ट आहे .
*” सबका साथ , सबका विकास , सबका विश्वास आणि सबका प्रयास “* या मंत्रासह पुढे वाटचाल करत असलेल्या भारतात सर्वांच्या आयुष्यात समान सन्मान मिळावा अशा पद्धतीने मोदी सरकारचे काम सुरू आहे .