You are currently viewing सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला नगरपरिषदेचा राखीव प्रभाग मसुदा प्रसिध्द

सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला नगरपरिषदेचा राखीव प्रभाग मसुदा प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील दि 9 जून 2022 राजीचे पत्र, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 10 अन्वये जिल्ह्यातीली नगरपरिषद सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला  सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता जे प्रभाग राखून ठेवण्यात आलेले आहेत ते प्रभाग दर्शविणारा आदेशाचा मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर दि. 15 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या तिन्ही नगरपरिषदांच्या कार्यालयामध्ये नगरपरिषद क्षेत्रातील लोकांच्या माहितीसाठी कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आली आहे.

          या आदेशाच्या मसुद्यात कोणाची हरकत व सूचना असल्यास त्या संबंधितांचे सकारण लेखी निवेदन संबंधित नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या नावे  नगरपरिषद कार्यालय येथे मंगळवार दि. 21 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पोहचेल असे पाठवावे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच निवडणूक आयोगाच्या दि.9 जून 2022 च्या  आदेशानुसार प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा